जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल कांबळे यांची निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : सिद्धार्थ नगर निडेबन वेस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी भीम आर्मीचे राहुल कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष : अमर गायकवाड, सचिव: दिनेश वासरे, कार्याध्यक्ष : मनोज गायकवाड,कोषाध्यक्ष ; मोहन गंडारे यांची निवड तर मार्गदर्शक म्हणून राजकुमार भालेराव, अनिल मुदाळे,प्रदीप गायकवाड, प्रा.संजय जामकर यांची निवड करण्यात आली आहे.
जयंती महोत्सव समितीचे ज्येष्ठ सदस्य विनायक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.या बैठकीस नरेंद्र उजेडकर, प्रा.राजू कांबळे, लक्ष्मण पकोळे, नरसिंग वायकोळे, श्याम मसुरे, सतीश वाघमारे यांची उपस्थिती होती.कार्यकारिणीत निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे.