1986 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामलाल मेमोरियल हायस्कूल उदगीर येथील १९८६ वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच अंजरले बीच दापोली ‘ टर्टल होम स्टे’ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. 1986 च्या बॅचमधील बहुतांश विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. काहीजण डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक तर काही जण खाजगी क्षेत्रात, तर काही शासकीय सेवेत रुजू आहेत. सर्व मित्रांनी स्नेहसंमेलनात आपल्या शालेय जीवनातील गप्पागोष्टी एकमेकांशी शेअर केल्या. दोन दिवशीय स्नेहसंमेलनामध्ये सर्वांनी मनसोक्त आनंद उपभोगला. पहिल्या दिवशीच 1986 बॅचमधील दिवंगत विद्यार्थ्यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली, व जे शिक्षक हयात नाहीत त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. एकमेकांशी कायम संपर्क ठेवण्याचा व एकमेकांना मदत करण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी निर्धार व्यक्त केला. तसेच दरवर्षी असाच स्नेहसंमेलन आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला. या गेट टुगेदर मध्ये डॉ.दयानंद सूर्यवंशी, डॉ. गंगाधर परगे, डॉ.सुबोध गुजराथी, डॉ. गोविंद टिळे, डॉ. धनाजी कुमठेकर, डॉ. अनिल भताने, डॉ. दीपक केंद्रे, अनिल बिरादार, बालाजी बिरादार. काळे विजय . अचवलकर दत्ताजी, स्वामी रविंद्र,सीताराम केंद्रे, प्रमोद पारखे, प्रफुल्ल परांडेकर, अनिल जोशी, वेंकटेश पेन्सलवार, रवी बिरादार,देवने राजेश, शैलेश पाटील, विजय नागरगोजे, श्रीकांत मालपाणी, संजय भेंडे,मनोज मोगले, अलोक मेहरा, सुनील गरड, आनंद आंबेसंगे, अशोक हेरकर, इत्यादी जणांची उपस्थिती होती.