मोफत अँनिमिया तपासणी शिबीर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, सामान्य रुग्णालय उदगीर व इंटरॅक्ट क्लब ऑफ महेश प्रा. विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महेश प्राथमिक विद्यामंदिरात मोफत अँनिमिया तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी शाळेतील १०० विद्यार्थीनींची तपासणी करण्यात आली. यावेळी आयर्न औषधीचे वाटप करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंगला शेट्टे, आर.डी. होनराव, एन.डी.भिंगोरे, जे.पी. बिरादार, एच. एल. हल्लाळे, बी. पी. शिंदे, एस. एस. स्वामी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी, अँड. विक्रम संकाये, चंद्रकांत ममदापुरे, संतोष फुलारी, विशाल तोंडचीरकर, पवन मुत्तेपवार, डॉ. बस्वराज स्वामी उपस्थित होते.