राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळेवाटप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळेवाटप

अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे रुग्णांना फळेवाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा आवहानानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.

यावेळी कृ.उ.बा. सभापती तथा जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प.सदस्य माधवराव जाधव, शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, डॉ.सुरजमल सिंहाते, डॉ.अमृत चिवडे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, रुग्ण कल्याण समिती सदस्य हुसेन मणियार, युवक तालुका अध्यक्ष दयानंद पाटील, संचालक शाम पाटील, फेरोज शेख, तानाजी राजे, शेनकुडचे सरपंच गोपीनाथ जायभाये, इलियास सय्यद, इबु बागवान, आशिष तोगरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!