एलसीबीची पुन्हा धडाकेबाज कामगिरी !!प्रतिबंधित गुटखा विकणाऱ्यांची आली आता बारी !!

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सतत एकापेक्षा एक धडाकेबाज कामगिरीने गाजत आहे. अवैध धंद्यावरच्या धाडी असतील नाहीतर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर टाकलेल्या धाडी असतील. ही कामगिरी गतिमान असतानाच पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने
वाहनासह 4 लाख 3 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त करून, 2 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवित येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ, तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय, वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीवरून पथकाने दिनांक 06/04/2025 रोजी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 88 हजार 800 रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू गुन्ह्यात वापरलेले एक चार चाकी वाहन व एक मोबाईल असा एकूण 4 लाख 3 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामेअभिलाष गुरुनाथ गीते (वय 19 वर्ष, राहणार पशुपतिनाथ नगर, लातूर), मुकेश लहाने.(फरार)यांचे विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी मुकेश लहाने यांचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी चे पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंग राजपूत, पोलीस अंमलदार दत्तनगिरे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे,अर्जुन राजपूत, राहुल कांबळे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.