राम हाच मानवाचा आचार आणि विचार – ह.भ.प ज्ञानेश्वर जवळे

0
राम हाच मानवाचा आचार आणि विचार - ह.भ.प ज्ञानेश्वर जवळे

उदगीर (एल.पी.उगीले)
प्रभू श्रीराम हाच मानवाचा आचार असावा,प्रभू श्रीराम यांचाच विचार मानवाने ध्यानात घ्यावा, तरच जीवनाची फलश्रुती आहे.आई-वडिलांचा आदर म्हणजेच श्रीरामभक्ती होय. या जीवनाच्या कल्याणाकरिता मानवाने क्षणाक्षणाला भगवंताचे नामस्मरण केलेच पाहिजे. त्याशिवाय उद्धार नाही. जीवन जगत असताना प्रत्येकानेच आपल्यातील काम, क्रोध, मोह, माया इत्यादी विकारांचा म्हणजेच आपल्यातील राक्षसी वृत्तीचा त्याग केला तर आपण सुद्धा रामरुप झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकानेच प्रत्येकातल्या रामाला ओळखायलाच हवे. असे प्रतिपादन ज्ञानेश्वर जवळे महाराज यांनी श्री राम मंदिर जळकोट रोड समिती उदगीर तर्फे आयोजित केलेल्या प्रवचन सेवेतून केले. राम मंदिर जन्मोत्सव समितीतर्फे त्यांच्या प्रवचनाचे आयोजन राम मंदिर जळकोट रोड उदगीर विश्वस्त मंडळी यांनी केले होते. याप्रसंगी राम मंदिर परिसरातील भाविकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मंदिर जळकोट रोड चे प्रमुख विश्वस्त अजय दंडवते,मेघशाम कुलकर्णी, प्रमोदराव कुलकर्णी,यशवंत बारस्कर ,नागनाथराव कोंडेकर,गोपाळ जोशी,छाया जोशी,सुनीती दंडवते, माधव घोणे या सर्वांनी प्रयत्न केले. प्रवचनानंतर गुलाल उधळण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. व त्यानंतर आरती व पाळणा गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!