प्रभु श्रीरामांची आरती आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते

उदगीर (एल.पी.उगीले) : शहरात श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभा यात्रा श्रीराम प्रतिष्ठाण ट्रस्ट यांच्या वतीने उदगीर शहरातुन काढण्यात आली होती. यावेळी राम मंदिरात प्रभु श्रीराम यांची आरती माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते करुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
जन्मोत्सवानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने प्रभू श्रीराम यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा प्रारंभ माजी क्रीडामंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, विजयकुमार निटुरे, मनोज पुदाले, बालाजी भोसले, श्रीमंत सोनाळे, बाळासाहेब पाटोदे, कुणाल बागबंदे, सतिश पाटील, अजय नवरखेले, दिलीप गायकवाड, भास्कर पाटील, आशिष अंबरखाने, अभिजित पाटील, संतोष फुलारी, प्रशांत ममदापुरे, अमोल अनकल्ले, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते श्री राम मंदिरात आरती करण्यात आली.यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, उदगीर शहरातील व परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.