भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन पक्षाच्या उदगीर शहर कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, दिलीप गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, अमोल निडवदे, सरोजा वारकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणाची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. दत्ताजी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसाद नाईकवाडे यांनी केले.
यावेळी बापूराव यलमटे, आनंद बुंदे, अमोल अनकल्ले, ऍड. सावन पस्तापुरे, साईनाथ चिमगावे, पप्पू गायकवाड, मोतीलाल डोईजोडे, मारोती कोटलवार, रामेश्वर चांडेश्वरे, सुनील गुडमेवार, संतोष बडगे, सचिन सूर्यवंशी, अमर सूर्यवंशी,विजय पाटील, गणेश गायकवाड, बालाजी गवारे, सुनील सावळे, साधू लोणीकर, रवींद्र बेद्रे, केशव रंगवाळ, राहुल आपटे, अनिल मुदाळे, अरुणा चिमगावे, शिवकर्णा अंधारे, मंदाकिनी जिवणे, बबिता पांढरे, आदिसह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.