भालचंद्र शेळके पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने गौरव!!

उदगीर (एल.पी.उगीले)
गावात शांतता व सलोखा राखण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. पोलीस पाटील हे प्रशासन व नागरिक यांच्या मध्ये समन्वकांची भूमिका पोलीस पाटील बजावत असतात. त्यामुळे जिल्हा स्तरावरील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारले जाणार आहे. त्याची सुरवात मी स्वतः वर्धा जिल्हा पासून करणार आहे. अशी माहिती गृहराज्य मंत्री(ग्रामीण)व गृहनिर्माण राज्यमंत्री पंकजजी भोयर यांनी पुणे (भोसरी) येथे व्यक्त केली.
राज्य गावाकमगार पोलीस पाटील संघा तर्फे भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार सोहळायात ते बोलत होते.
डोंगरशेळकी तालुका उदगीर येथील आदर्श पोलीस पाटील भालचंद्र शेळके पाटील यांना आदर्श पोलीस पाटील म्हणून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भालचंद्र शेळके पाटील हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ते गोरगरीब व आडल्या नडल्याना मदत करीत असतात,ते प्रशासन व नागरिक यांच्या मध्ये दुवा म्हणून उत्कृष्ट कार्य करीत असतात. त्याचीच दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी मंत्री पंकज भोयर, आ.महेश दादा लांडगे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, खेड कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिकाजीं पाटील व राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे पाटील, राज्यउपाध्यक्ष भाऊसाहेब सपाटे पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा तृप्ती मांडेकर व राज्यभरातून विविध पदाधिकारी,पोलीस पाटील उपस्थित होते.
ना.भोयर पुढे म्हणाले कि, आर्थिक पाठबळ देण्यासाठी पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. पोलीस पाटील कोणत्याही समस्या घेऊन सरकारकडे आल्यास त्या सोडविण्या चा प्रयत्न केला जाईल. मंत्री या नात्याने मी शेवट पर्यत पोलीस पाटील संघटनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहीन.
सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या आदर्श पोलीस पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील संघटने तर्फे सरकारकडे मागण्याचे निवेदन देण्यात आले. या मध्ये पोलीस पाटील यांचे निवृतीचे वय 60वरून 65 करणे, दहा हजार रुपये निवृति वेतन मिळणे, नूतनिकरण कायमचे बंद करणे, शासनाकडून कुटुंबीयांना मोफत आरोग्य सेवा दिली जावी, पोलीस पाटील यांच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात अदि मागण्याचे निवेदन देण्यात आले. या मागण्याचे राज्य शासनाद्वारे पूर्णकरण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहराज्य मंत्री भोयर यांनी उपस्थित पोलीस पाटलांना दिले.