वनस्पती रोगशास्त्रातील आधुनिक संशोधनाने कृषी क्षेत्रात नवे क्षितिज खुले होईल — डॉ. साधना राय

उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे “वनस्पती रोगशास्त्रातील प्रगती” या विषयावर राष्ट्रीय पातळी वरील निमंत्रित ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख स्रोत व्यक्ती म्हणून डॉ. साधना राय, सहायक प्राध्यापिका, वनस्पतीशास्त्र विभाग, एन आय एम एस विद्यापीठ, जयपूर (राजस्थान) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वनस्पती रोगशास्त्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील संभाव्यता यावर सखोल माहिती दिली. तसेच, त्यांनी वनस्पती रोगशास्त्रातील विविध संधींचे सविस्तर स्पष्टीकरण केले, आणि या क्षेत्रातील प्रगत संशोधनाच्या दिशा सविस्तरपणे उलगडून सांगितल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के व उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या उपस्थितीत झाले. डॉ. राहुल अलापूरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. व्ही. एस. नागपूर्णे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता डॉ. आर. आर. तांबोळी यांच्या समारोपपर भाषणाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आर. बी. अलापूरे, डॉ. व्ही. एस. नागपूर्णे आणि मुस्कान मणियार यांनी प्रयत्न केले.