जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती कांता रामराव सोमवंशी यांना जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले) देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील नृसिंह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांता रामराव सोमवंशी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून उत्कृष्ट विद्यादान करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुजनांना आदर्श शिक्षक गुरु गौरव पुरस्कार दिला जातो. सदरील पुरस्कारासाठी श्रीमती कांता रामराव सोमवंशी यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संयोजकांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरू गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते दि. 26 एप्रिल 2025 रोजी दयानंद महाविद्यालय सभागृह लातूर येथे प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल लातूर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गुरूमे, देवणी तालुका कार्याध्यक्ष सुनील क्षीरसागर, यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक गुरुजना अभिनंदन केले आहे.