सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण

उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर शहरात व तालुक्यातील सर्व १३२ केव्ही, ३३ केव्ही, उपकेंद्र, सौर ऊर्जा भले मोठी युनिसचा सतत विजेचा लपंडाव चालू असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. कोणतीही पुर्वसुचना न देता दिवसा व रात्री विज पुरवठा खंडित होत आहे. विज वितरण कार्यालयात संपर्क केला असता फोन लागत नाही. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी? असा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. सततच्या विजेच्या लपंडावांना सर्वसामान्य नागरिकासह भर उन्हाळ्यात गर्मीच्या उकाड्यात विजेच्या अभावी त्रस्त ग्राहकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या तोंडाला काळे फासले जाईल व विजेचा पुरवठा सतत सुरू नाही ठेवल्यास गाढवावरून धींड काढण्याचा इशारा येथील महाराष्ट्र दलित तरुण संघटनेने इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विविध क्षमतेच्या, एमव्हीए, क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला असून आतातरी विज पुरवठा अखंडीतपणे चालू राहील, अशी अपेक्षा होती. परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च, असल्याने शासकीय कामकाजासह इतर विविध कारखानदारी, घरगुती व्यवसायिक तसेच गावाला व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी व ऑनलाईन माहिती सादर करताना विजेच्या अभावी कॉम्प्युटर व शासकीय, निमशासकीय कार्यालयात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक दंड सोसावा लागत आहे. उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा योजना विज पुरवठा होत नसल्याने खंडित होत आहे. तरी विज वितरण कंपनीने विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र दलित तरुण संघटनेने व वीज ग्राहकांसह नागरिकांनी केली आहे.
या सततच्या विजेच्या लपंडावांना कंटाळून सोमवारी प्रभारी कार्यकारी अभियंता जाधव यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे सह इतरांनी भेट घेऊन चर्चा केली असता, ते म्हणाली की, उदगीर उदगीर विभागात अधिकारी यांनी कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे. हे त्यांनी मान्य केले. लागलीच यापुढे विजेचा पुरवठा सुरळीत करू असे जाधव यांनी आश्वासन दिले.