स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या युवकांचे कार्य कौतुकास्पदच ; तहसिलदार राम बोरगावकर

उदगीर (एल.पी.उगीले)
श्रीरामनवमी निमित्ताने श्री. हावगीस्वामी चौक, रोकडा हनुमान रोड येथील हनुमान मंदीर चौक येथे अहिल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हावगीस्वामी चौक, उदगीर च्या वतीने तसेच नवतरुण युवक मंडळ व श्री.सदगुरू उदालिक ऋषी उदागीरबाबा महाराज यांच्या पावनभूमीतील आशीर्वादाने प्रेरणेने श्रीराम नवमी निमित्ताने व रोकडा हनुमान महाप्रसाद निमित्ताने सर्वसामान्य अबालवृद्ध महिला, पुरुष, लहान बालके, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस प्रशासन सह कष्टकरी, कामगार, इमारत बांधकाम कामगारांसाठी श्रीराम नवमी निमित्ताने भरदिवसा व भरउन्हात भव्यदिव्य रॅली काढली जाते. यात सर्व भाविक भक्तांना शरबत व लिंबू पाणी, पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याची उत्तम व उत्कृष्ट व्यवस्था चे आयोजन करण्यात आले होते. याचा रॅलीतील हजारो भावी भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. लहान विद्यार्थी व अहिल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हावगीस्वामी चौक उदगीर, विविध सेवाभावी संस्था, हावगीस्वामी चौकातील नवतरुण युवक मंडळ यांनी एकत्रित येऊन हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राम बोरगावकर, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, डॉ.माधव चंबुले, डॉ.लक्ष्मण ढोकाडे, संजय उर्फ बाळासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, माजी सरपंच सतीश पाटील मानकीकर यांच्या उपस्थितीत शरबत चे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत अर्जुनराव जाधव-पाटील, उपाध्यक्ष अर्जुनराव जाधव, सचिव अनिकेत जाधव-पाटील, बालाजीराव जाधव, डॉ. अशोकराव भोसले, महेश देवणीकर, अलोक नुत्ते, सतीश मुळे, गणेश चौधरी, आशुतोष राणा, जयेश गोस्वामी, प्रज्वल हैबतपुरे, अमोल लोहकरे, सौरभ गुडमेवार, आदित्य कुलकर्णी व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.