खेर्डा येथील पांडुरंग देव रामचंद्र मंदिर येथे रामनवमीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)
सीमा भागतील औराद तालुक्यातील खेर्डा येथे 400 वर्षांपूर्वीचे श्री पांडुरंग देव रामचंद्र मंदिर आहे.
रामचंद्र जन्मउत्सव कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान कमिटी तर्फे मंदिराचे निर्माण कार्य करण्यात आलेले होते.
राम जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त ह.भ.प.विष्णु महाराज काळे संभाजीनगर यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन करण्यात आले.सकाळी समाज सेवक रामबिलास नावंदर यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र मंदिर येथे अभिषेक करण्यात आला. लगेच गावातील सर्व भजनी मंडळ व नागरिक यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता गुलाल व महिला मंडळाच्या वतीने जन्मोत्सवचा पाळना हलवुन गाणे म्हणण्यात आले. लगेच आरती करून मंदिरात नैवेद्य दाखवण्यात आले.गावातील सर्वांना महाप्रसाद रुपी जेवण नावंदर परिवारच्या वतीने देण्यात आले. गावातील लहान थोर सर्व मंडळी महाप्रसादाचा आनंद घेतले. या कार्यक्रमाला गावातील वैजनाथ महाराज, विजयकुमार महाराज, बसवराज स्वामी, पिराजी गुरूजी पाबाळु, गोपाळ पाटील, राजीव नाईक, विठ्ठल महाराज,संदीप महाराज, शिवाजी महाराज व गावातील सर्व नागरिकानी सहभागी झालेले होते.