उबाठा शिवसेना जळकोट तालुकाप्रमुख पदी विकास सोमुसे-पाटील यांची नियुक्ती

उदगीर (एल.पी.उगीले)
शिवसेनेमध्ये फटाफुट झाल्यानंतर अनेक शिवसैनिक हे सत्ते सोबत गेले. मात्र काही निष्ठावंतानी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली नाही. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांना योग्य त्या पदावर काम करण्याची संधी देण्याचे काम सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुरू केले आहे.
जळकोट तालुक्याचे नेते विकास गोविंदराव सोमुसे-पाटील यांची जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी आ. रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजीभाऊ रेड्डी यांच्या शिफारशी नुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
जळकोट तालुका प्रमुख पदावर दुसऱ्यांदा अतनूर तालुका जळकोट येथील बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी कट्टर समर्थकाची निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन करून स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.
त्यांची नियुक्ती जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख, मराठवाडा विभाग प्रमुख,जिल्हाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख तसेच इतर बाळासाहेब ठाकरे समर्थक नेतृत्वाच्या शिफारशीने करण्यात आली आहे.