शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख पदी कैलास पाटील यांची निवड, सर्वत्र आनंदोत्सव

0
शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख पदी कैलास पाटील यांची निवड, सर्वत्र आनंदोत्सव

उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या फाटाफुटी नंतर बरेच चढ उतार झाले. सत्तेसाठी कित्येक लोक भारतीय जनता पक्ष सोबत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. मात्र असे असतानाही कित्येक शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहत, मूळ शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. असे छातीठोकपणे सांगत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काम करण्याचा निर्धार केला. अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि संघटन कुशल नेतृत्व असलेल्या ग्रामीण भागातील सक्रिय परिणामकारक नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान आणि योग्य त्या पदावर नियुक्ती करून पक्ष संघटन बांधणीसाठी पुन्हा नव्या दमाने शिवसेनेने मोठे पाऊल उचलले आहे.
त्यामध्येच लातूर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करणारे कैलास पाटील यांनी पूर्वी तालुकाप्रमुख म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांचे उल्लेखनीय काम पाहून त्यांना उपजिल्हाप्रमुख म्हणून बढती दिलेली आहे. तसेच संघटन बांधणीच्या दृष्टीने त्यांनी उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून संघटन बांधणी करावी. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच सिद्धेश्वर औरादे यांची निवड सहसचिव पदावर करण्यात आली आहे. त्यांच्यावर लातूर ग्रामीण, उदगीर, (राजुर)अहमदपूर विधानसभा मतदारसंघात काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तसेच शिवसेनेचे जुने कार्यकर्ते अंकुश कोनाळे यांना विधानसभा संघटक म्हणून उदगीर विधानसभा मतदारसंघात काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रा. दत्ता मोरे यांची नियुक्ती विधानसभा समन्वयक म्हणून करण्यात आली आहे. तसेच प्रशांत मोरे यांना उदगीर तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जळकोट साठी विकास सोमवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बालाजी सोनाळे यांची नियुक्ती उदगीर शहर प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. तसेच व्यंकट साबणे हे उदगीर तालुका समन्वयक म्हणून काम करणार आहेत, तर शंकर धोंडापूरे हे जळकोट तालुका संघटक म्हणून काम करणार आहेत. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कैलास पाटील यांच्या निवडीनंतर त्यांच्या मित्रमंडळी कडून त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कैलास पाटील यांनी स्पष्ट केले की, आपण सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी शिवसेने सोबत आहोत. शिवसेनेला उभारी घ्यायला थोडासा वेळ लागेल, मात्र जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फक्त महाराष्ट्र नव्हे तर जगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पाहिलेला आहे. एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून देशात त्यांची ओळख झालेली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्यासोबत काम करण्यामध्ये स्वाभिमान आहे, आणि त्या स्वाभिमानासाठीचा आम्ही शिवसेने सोबत आहोत असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!