अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ना. पाटील यांच्याकडून पाहणी

अहमदपूर (एल.पी.उगीले) तालुक्यातील लिंगदाळ येथील शेतकरी माधवराव गुंडरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची ना. बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील फळबाग व विद्युत सोलार तसेच आजूबाजूच्या परिसरातील विद्युत खांब मोठ्या प्रमाणात पडले होते. तात्काळ महावितरणशी संपर्क साधून विद्युत खांब बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिले. प्रसंगी नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच प्रशासकीय स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
यावेळी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे, तहसीलदार उज्वलाताई पांगारकर, तालुका कृषी अधिकारी बावगे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, अविनाश देशमुख, माजी सरपंच गंगाधर गुरमे, संदीपान गुरमे यांसह नांदुरा, गोताळा, लिंगदाळ येथील शेतकरी बांधव, पोलिस प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.