महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताहाचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली आहे. या कालावधीत भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, परिसर स्वच्छता अभियान, परिसंवाद, व्याख्याने, ग्रंथ प्रदर्शन यांसह निबंध, वक्तृत्व आणि पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. व्ही. डी. गायकवाड, प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, तसेच प्राचार्य बी. एम. खंदारे यांची व्याख्याने होणार असून, विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे महत्त्व पटवून देण्याचा उद्देश आहे. या सप्ताहात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. के. मस्के तसेच समितीचे प्रमुख प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी केले आहे.