शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक आरोग्य दिनानिमित्त बालकांसाठी आरोग्यदायी आहार या विषयावर मार्गदर्शन

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात ,धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीरच्या वतीने जागतिक आरोग्य दिन ऐवजी संपूर्ण आठवड्याचा आरोग्य आठवडा साजरा करून ‘बालकांसाठी आरोग्यदायी आहार ‘या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी डॉ.दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ.अस्मिता भद्रे, डॉ.शिवकुमार वर्तुळे, डॉ.रवी पाटील उपस्थित होते.डॉ.शिवकुमार मरतुळे यांनी विद्यार्थ्यांना आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्यदायी आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात दूध, पालेभाज्या व फळे तसेच,ड्रायफ्रुट्स घ्यावे.आपला आहार सकस व संतुलित असावा. आरोग्यदायी आहाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ.रवी पाटील यांनी दातांची निगा कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन केले सर्व टिमने विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी सर्व टिमचे आभार मानले.