वाल्मिकी रामायणावरील प्रवचने या कार्यक्रमात साहित्यिका सुरेखा गुजलवार यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर येथील राष्ट्र सेविका समिती द्वारे लक्ष्मीबाई केळकर यांच्या “वाल्मिकी रामायणावरील प्रवचने “ या रामायण ग्रंथाचे अभिवाचन मोहिनीताई देशपांडे यांच्या पटांगणात हे आयोजन केले होते.दरवर्षी होणाऱ्या या रामायणकथेचे अभिवाचन गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत संपन्न होते.
उदगीरचे माजी मंत्री तथा आ. संजय भाऊ बनसोडे यांनी सदिच्छा दिल्या. व या “रामायण यज्ञास “अत्यंत सहृदय भेट दिली .याप्रसंगी राष्ट्र सेविका समितीच्या शहर कार्यवाहिका सौ अपर्णा पटवारी , लातूर जिल्हा संपर्क प्रमुख सौ. सुनीता नेलवाडकर,राष्ट्र सेविका समितीचे कार्यकारिणी मंडळ, अश्विनी देशमुख,उदगीर शहरातील अनेक भाविक श्रोते म्हणून उपस्थित होते . विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, दत्तात्रय देशपांडे यांनी आ.संजय बनसोडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
तब्बल तीन वर्षापासून रामायणाचे अभिवाचन करणाऱ्या साहित्यिका सौ. सुरेखा गुजलवार यांनी आपल्या अमोघ ,ओजस्वी वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .
आ. संजय बनसोडे यांनी भावुकतेने रामायणकथेचे श्रवण केले . रामनवमी च्या उत्सवप्रसंगी भरतभेट आणि शबरी चरित्र हे अभिवाचनाचे विशेष आकर्षण होते.
याप्रसंगी आ. संजय बनसोडे यांनी साधला संवाद आणि राष्ट्रीय तसेच धार्मिक विचारांची उकल करण्यासाठी राष्ट्र सेविका समितीच्या लक्ष्मीबाई केळकर यांच्या प्रभावि विचार प्रणाली खाली संपन्न झाली.
रामायण अभिवाचन करणाऱ्या सुरेखा गुजलवार यांचा आ. संजय बनसोडे यांनी शाल श्रीफळ देवून यथोचित सन्मान केला .दिपालीऔटे, नीता मोरे,डॉ संजीवनी भातांब्रे ,डॉ तृप्ती दाचावार ,डॉ संतोषी मलगे ,
प्रा.कवडेकर ज्योती ,सरिता हरकरे , स्वाती देबडवार , सौ. छाया चिद्रेवार, सौ.मीना केंद्रे, श्रीमती शोभा मोरे, श्रीमती मोहिनीताई देशपांडे,सौ. लता कुलकर्णी, प्रणिता पारसेवार, संध्या कुलकर्णी, श्रीमती कोटलवार यांच्यासह श्रोतावर्ग उपस्थित होता.