बहुजन विकास अभियानाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) स्त्री शिक्षणाला प्रथम स्थान देणारे, स्त्रियांचे कैवारी, गोरगरीब जनतेचे कैवारी,शेतकरी, कष्टकरी, जाती निर्मूलनाच्या व्यथा मांडणारे, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती बहुजन विकास अभियानच्या वतीने साजरी करण्यात आली. महात्मा फुलेंनी संपूर्ण आयुष्य संकटाशी लढून, स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी अग्रेसर राहिले. पहिली शिक्षिका फातेमा सारख्या महिलेला शिक्षणाच्या प्रवाहात आणून, मोलाचा सन्मान देण्याचे काम महात्मा फुलेंनी केलेले आहे. पुण्यामध्ये जातीवादी लोक महात्मा फुलेंच्या शाळेला विरोध करत असताना, वस्ताद लहुजी साळवे यांनी त्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचे पाठीराखा होऊन साथ दिली. अशा महात्म्याला आज आम्ही कोटी कोटी प्रणाम करतोत, असे अभियान प्रमुख संजय कुमार यांनी स्पष्ट केले. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, रवी डोंगरे, गोरख वाघमारे, शेख जावेद, रशीद सय्यद, नितीन गाजरे, उमाकांत वादळे, राजकुमार कारभारी, तातेराव पाटील, गोविंद प्रजापती, नारायण प्रजापती, शिवकांत म्हेत्रे, शेख सरोवर, गंगाधर शेवाळे, बब्रुवान वाघमारे इत्यादी उपस्थित होते.