छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले)
एकोणिसाव्या शतकातील थोर समाज सुधारक बुद्धीवादी विचारवंत, समाजसुधारक,धर्मचिकित्सक, शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्रियांचे उद्‌धार करते, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, क्रियाशील कार्यकर्ते, लेखक आणि कवी म्हणून भारताच्या इतिहासात महात्मा जोतीराव फुले यांचे नाव अग्रस्थानी आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे यांनी केले. ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीच्या निमित्ताने बोलत होते. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.डॉ. मांजरे पुढे म्हणाले,महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या साहित्यातून दीन दलीत, शुद्र यांच्या कल्याणासाठी व उद्‌धारासाठी आपली लेखनी झिजविले.म्हणून त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे म्हटले जाते. महात्मा फुले उत्तम कवी आणि लेखक होते.त्यांच्या विचारातून पुढील काळात स्त्रीवादी आदिवासी,दलित,ग्रामीण चळवळी उभ्या राहिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रा.डॉ. सुरेश शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.डी.बी.मुळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!