आरोग्याच्या बाबतीत जनतेला योग्य त्या सुविधा पुरविणार : आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती हे आपले शरीर आहे. आपल्या शरीराची काळजी घेण्याचे काम आपण स्वतः केले पाहिजे. येत्या काळात माझ्या जनतेला आरोग्याच्या संदर्भातील सुख – सुविधा व इतर कुठल्याही बाबतीत काही कमी पडु देणार नसुन मतदार संघातील जनतेला योग्य त्या सुविधा पुरविणार असल्याचे मत माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
सेवा दंत रूग्णालय व आय डी ए लातूर शाखेच्या वतीने विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मौखिक व दंतरोग तपासणी व उपचार शिबीराच्या उद्धाटनाप्रसंगी आ.बनसोडे बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे हे होते.यावेळी माजी नगराध्यक्षा उषा कांबळे,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.पांडुरंग दोडके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सचिन राठोड, डाॅ.दत्तात्रय पाटील, डाॅ.दत्तात्रय पवार, निमाचे अध्यक्ष डाॅ.राजकुमार घोणसीकर, डाॅ.चंद्रकांत कोठारे, डाॅ.शिल्पा लटुरिया, डाॅ. जगदीश रावीकर, मनोहर कांबळे, श्रीरंग कांबळे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, सुभाष धनुरे, अनिल मुदाळे, इम्तियाज शेख, श्याम डावळे, समीर शेख, समद शेख, प्रकाश येरमे, इब्राहिम देवर्जनकर, महेश बिरादार, बाळासाहेब पाटोदे, विलास शिंदे, राजकुमार चव्हाण, आदी उपस्थित होते.या शिबीराचे आयोजन डाॅ.गोविंद सोनकांबळे यांनी केले होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, आपण सर्वजन महापुरुषांच्या विचारावर चालत असतो आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण त्यांचे कार्य सांगून त्यांच्यावर संस्कार करत असतो, मात्र महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवून आपण महामानवांना समाज कार्यातून आदरांजली वाहत आहोत. याचा आदर्श इतरांनी घ्यावा. सामाजिक भान ठेवुन आपण काम केले पाहिजे. डाॅ.गोविंद सोनकांबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मौखिक व दंतरोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करुन गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचे वृत्त हे कौतुकास्पद आहे. आपल्या शहरातील सामान्य रूग्णालयात २०० बेड उपलब्ध आहेत. याचा फायदा या भागातील रूग्णांना होत आहे. आॅक्सिजन प्लाॅन्ट, ट्रामा केअर, औषधी आदी सुविधा असुन यापेक्षाही अधिक आवश्यक त्या सुविधा रुग्णांना आपण पुरविणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.यावेळी शास्त्री नगर येथील नागरिकांच्या वतीने आ.संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.सुत्रसंचलन डाॅ. बनशेळकीकर यांनी केले तर आभार डाॅ.विजय करपे यांनी मानले.
यावेळी वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी , रुग्ण व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.