सामाजिक बंधुभाव हीच संत साहित्याची शिकवण – आ. बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले): महाराष्ट्र ही संताची भुमी आहे. येथे विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहेत. आपल्या पुढच्या पिढीमध्ये वारकरी सांप्रदायामुळेच चांगले संस्कार येत असुन संताची शिकवण आपल्या पिढीने जपली पाहिजे. त्यामुळेच सामाजिक बंधुभाव वाढतो, हीच तर खरी संत साहित्याची शिकवण असुन ग्रामीण भागातील गावागावात सध्या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहामुळे गावात चैतन्याचे वातावरण असुन सप्ताहामुळे गावाला ऊर्जा मिळत असल्याचे मत माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील मौजे जयाबाईचीवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ह.भ.प. छायाताई कदमापुरे,श्याम डावळे, भागवत गुरमे, लक्ष्मण जाधव, लक्ष्मण गुराळे, सतिश सुळे महाराज, सुदर्शन मुंडे, ज्ञानेश्वर बिरादार, पुरुषोत्तम मुंडे, विलास मुंडे, विठ्ठल मुसळे, विश्वनाथ मुंडे, राज तवंडे ,बालाजी पुरी, गोविंद मुंडे, ज्ञानेश्वर केंद्रे, पांडुरंग मुंडे, केशव कांबळे, विश्वनाथ मुंडे, तानाजी मुंडे, बालाजी केंद्रे, वामनराव मुंडे, बळीराम केंद्रे, रामकिशन मुंडे, बापूराव मुंडे, महादेव मुंडे, संतोष मुंडे, रुक्मीनबाई केंद्रे, जानकीबाई मुसळे, वेणूबाई केंद्रे, मुक्ता मुंडे, वेनु केंद्रे, गंगुबाई मुंडे, अरुणा मुंडे, लक्ष्मी मुंडे, सविता मुंडे, सुलुबाई केंद्रे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राची भुमी ही संतांची भुमी आहे. म्हणून आपल्या येथे सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहामुळे आपला सांप्रदाय टिकुन आहे. पुढच्या पिढीवर सांप्रदायिक संस्कार होण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ महत्वाचे आहे, आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असुन वारकरी सांप्रदाय आपल्या समाजात जन जागृती करत असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगितले.यावेळी जयाबाईची वाडी , हेर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.