डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रयत्नातून आठ कोटी अडतीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता

लातूर (एल.पी.उगीले) लातूर शहराच्या विकासासाठी भाजपने त्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील रा.प.लातूर विभागातील लातूर बस स्थानक क्रमांक दोन आंबेजोगाई रोड येथील आवारात विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या बसेस करिता विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी रू.८,३८,२७,५०८/- आठ कोटी अडतीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आहे .
मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मुंबई येथे भेट घेत लातूरच्या राज्य परिवहन विभागातील विविध समस्यांवर चर्चा केली होती. त्यापैकी प्रामुख्याने बसेसची मागणी व चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीची मान्यता या दोन विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली होती. त्यामध्ये लातूर साठी दहा बसेस प्राथमिक स्वरूपात मंत्री महोदयांनी मंजूर केल्या, त्याचप्रमाणे नागरिकांना अद्ययावत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासोबतच इलेक्ट्रिक बसेसची मागणी व त्याबरोबरच राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागातील बस स्टँड क्र.२ येथील आवारात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्याबाबतचा प्रलंबीत प्रस्तावा बाबत मंत्री महोदयांशी चर्चा करताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या ई-बसेस साठी विद्युत चार्जिंग स्टेशन च्या उभारणी साठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री महोदयांकडे मांडली होती.
याच मागणीप्रमाणे नुकतेच राज्य सरकारने लातूर शहरातील विद्युत चार्जिंग स्टेशनच्या उभारणीसाठी आठ कोटी 38 लाख 27 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे लातूर येथे चार्जिंग स्टेशन उभारणीच्या मार्ग मोकळा झाला आहे. आगामी दोन महिन्यांमध्ये कामास सुरुवात होणार आहे.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास मिळावा, त्याच बरोबर प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या लातूर विभागालाही 109 इलेक्ट्रिकल बस मंजूर झाल्या आहेत. या अनुषंगाने आवश्यक चार्जिंग स्टेशन संदर्भात मंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. तसेच मंत्री महोदयांनी ही मागणी लक्षात घेत या विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणी साठी ८.३८,२७,५०८/- (आठ कोटी अडतीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रू.) एवढा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे उर्वरीत बसेस या इलेक्ट्रिक प्रणालीच्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
त्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितजी पवार, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व महायुती सरकारचे आभार मानले आहेत.