स्व.भाग्यश्री सुडे हत्या उज्वल निकम यांनी वकीलपत्र घेतले – डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर (एल.पी.उगीले) लातूर येथील विद्यार्थिनी भाग्यश्री सुळे यांची हत्या होऊन एक वर्ष उलटून गेले आहे.
या प्रकरणी तेव्हा सरकारी वकील म्हणून अॅड.तोरगटे यांची नेमणूक केली होती. परंतु आपण मागणी केली होती की, या प्रकरणासाठी सरकारी वकील म्हणून निष्णात वकील अॅड.उज्वलजी निकम यांची नेमणूक करावी. मी मागील १ वर्षांपासून सुडे परिवाराच्या संपर्कात असुन त्यासंदर्भात विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी मी आमचे मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत, या प्रकरणामध्ये अॅड.उज्वलजी निकम यांची नियुक्ती करावी, अशी विनंती केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासित केले होते.
त्यानुसार मागील महिन्यात 23 मार्च रोजी अॅड.उज्वलजी निकम यांनी स्व.भाग्यश्री सुडे प्रकरणाचे वकीलपत्र घेतले असून याची दुसरी तारीख येत्या २३ एप्रिल रोजी आहे. भाषणांपेक्षा प्रत्यक्षात जातीने लक्ष घालत मी गेली वर्षभर या प्रकरणाचा पाठपुरावा करत आलेल्या विनंतीला आता यश आले आहे.
सुडे परिवाराच्या यापुढेही न्यायालयीन कायदेशीर लढाईसाठी लागेल ते सहकार्य करण्यासाठी मी सदैव सुडे परिवाराच्या सोबत असल्याचा विश्वास स्व.भाग्यश्रीच्या आई वडिलांना दिला.
आशा आहे या प्रकरणाचा लवकरच निकाल लागून दोषींना फाशीची शिक्षा होऊन लातूरच्या लेकीला न्याय भेटेल. अशी आशाही डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केली आहे.
