रंगकर्मीच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त भव्य ऑनलाइन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025 आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम 5001 ₹ पप्पू गायकवाड यांच्या वतीने, द्वितीय 3001 ₹ डि.आर.शिंदे
अध्यक्ष ,समता अधिकार कामगार संघटना महाराष्ट्र, तृतीय 2001 ₹ आनंद वाघमारे यांच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे.आनलाईन स्पर्धेचे विषय महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांचे विचार हे ठेवण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा खुली आहे. वरील पैकी कोणत्याही एका विषयावरील व्हिडिओ ४ ते ५ मिनिटांपर्यंत असावा. व्हिडिओ बनवतांना चांगल्या व स्थिर कॅमेराचा वापर करावा. सुस्पष्ठता, प्रकाश, आवाज, ई. गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच स्पर्धकांनी आपला व्हिडिओ 9823160552 या क्रमांकावर व्हाट्सअप करावा.
व्हिडिओ सोबत संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, संपर्कासाठी मो.क्र.दयावे, व्हिडीओ पाठविण्याची अंतिम मुदत 21 एप्रिल 2025, दुपारी. 5 वाजेपर्यंत पाठवायचे आहे.प्रथम फेरी ऑनलाइन व दुसरी फेरी प्रत्यक्ष असेल.ऑनलाइन स्पर्धेतील प्रथम ११ स्पर्धकांना दुसर्या फेरीत प्रवेश असेल. प्रत्यक्षफेरी वेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक व सर्व सहभागी स्पर्धकांना संविधान प्रस्ताविची प्रत देण्यात येईल.
दुसरी व प्रत्यक्ष फेरी उदगीर येथे असणार आसुन, प्रत्यक्ष फेरिसाठी स्पर्थेचे परिक्षक वक्ते व साहित्यिक प्रा.आश्विनी देशमुख व साहित्यिका निता मोरे हे पहाणार आहेत.
भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत हक्क व कर्तव्य हा ठेवण्यात आला आहे. स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन रंगकर्मीचे अध्यक्ष
प्रा. बिभीषण मद्देवाड सचीव ज्योती मद्देवाड,सिद्घार्थ सुर्यवंशी , रसुल पठाण , रामदास केदार, महेश मळगे, लक्ष्मण बेंबडे, महादेव खळूरे, दादाराव दाडगे , विवेक होळसंबरे, मारोती भोसले , सचिन शिवशेट्टे, जहांगीर पटेल, ज्ञानेश्वर बडगे, हणमंत केंद्रे ,नागनाथ गुट्टे , संदिप निडवदे ,मनोहर लोहारे आदिंनी केलेले आहे.
