वक्फ संशोधन कायदा 2024 रद्द करण्यासाठी उदगीर मध्ये धरणे आंदोलन

0
वक्फ संशोधन कायदा 2024 रद्द करण्यासाठी उदगीर मध्ये धरणे आंदोलन

उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर येथील राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने वक्फ संशोधन कायदा केंद्र सरकारने पारित केला आहे. तो तातडीने रद्द करावा म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. कायदा हा संविधान विरोधी, स्वातंत्र्यावर घाला घालणारा असणारा हा कायदा तात्काळ रद्द करावा. म्हणून आंदोलनकर्त्यानी घोषणाबाजी केली.
या सरकारला जमिनी हडपून अदानी, अंबानीच्या घश्यात घालायचे आहेत. म्हणून याला हिंदू,मुस्लिम रंग देण्याचा सरकार प्रायोजित कार्यक्रम राबविला जात आहे. असे ज्येष्ठ सामाजिक नेते रंगा राचुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
देशामध्ये शांतता आणि अखंडता अबाधित ठेवायची असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांचे हक्क त्याला मिळायलाच पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक समूह आणि घटकांच्या बाबतीत विचारपूर्वक संरक्षण दिलेले होते. ते संरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याची खंत वाटत आहे.आपल्या शरीरातील एका बोटाला जर इजा झाली तर पूर्ण शरीरामध्ये त्याचा त्रास होतो, त्याच पद्धतीने देशातील एका समाजावर अन्याय, अत्याचार होत असेल तर आपला देश प्रगती करणार नाही. वकदीर संशोधन हे फक्त आणि फक्त बोर्ड मार्फत किंवा मुस्लिम साठी मर्यादित नसून हे घटनेवर झालेला खूप मोठा हल्ला आहे, म्हणून ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जायचे आणि गल्लीबोळातील सर्व समाजाला एकत्रित करून ही लढली जाण्याची तयारी आहे. आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन बसवराज पाटील नागरकर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले.
या धरणे आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदविला. प्रामुख्याने कल्याण पाटील ,रंगाराचुरे, मंजूर खान पठाण, महबूब शेख, शेख समृदिन, अहमद सरवर, अब्दुल समद बागवान, अझरोद्दीन शेख, साबीर पटेल ,शेख तयार, नसरुद्दीन शेख सलीम , शेख समीर ,अहसान सिद्दीफी, सय्यद जानीमिया, दायमी रहीम, हाश्मी मिसबा, डॉ. अजगर शेख इब्राहिम, डॉ.शब्बीर मौलाना अजीजू रहमान,मौलाना जाकीर मोलाना मोहयोद्दीन, शेख हमीद भाई नजरुल जळकोटे, मुदस्सिर शेख इत्यादी सह अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!