मोफत ॲनिमिया तपासणी शिबीर संपन्न

0
मोफत ॲनिमिया तपासणी शिबीर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, सामान्य रुग्णालय उदगीर व स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मोफत ॲनिमिया तपासणी शिबीर घेण्यात आले.
यावेळी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज व स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेजच्या १६० विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली.
शिबीर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी होत्या. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनिका पाटील यांची उपस्थिती होती.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या ज्योती तारे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे संतोष फुलारी, विशाल जैन, प्रमोद शेटकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!