एकंबेकर महाविद्यालयात पदवी परीक्षा सुरळीत चालू

उदगीर (एल.पी.उगीले)
कै बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत पदवी उन्हाळी परीक्षा 2025 सुरळीतपणे चालू झाल्या आहेत. संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुला पाटील यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओम प्रकाश क्षीरसागर उपस्थित होते. परीक्षा ही अत्यंत शिस्तीत व कॉफीमुक्त होत आहे. या परीक्षेसाठी विद्यापीठाचे प्रतिनिधी संयुक्त केंद्र प्रमुख डॉ. एम आर सुळे तर अंतर्गत केंद्र प्रमुख डॉ.मदन शेळके, सहकेंद्र प्रमुख डॉ.शिवहार साळुंके हे काम पाहत आहेत. परीक्षेसाठी एकूण विद्यार्थी 1200 आहेत, या परीक्षेचा कालावधी 2 एप्रिल ते 30 एप्रिल2025 पर्यंत आहे.