महात्मा फुले यांची जयंती उत्साह साजरी

उदगीर (एल.पी.उगीले)
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अशोकराव पेद्देवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरुण राठोड, प्रा. बालाजी पटवारी,व्यंकटराव पुठेवाड, महानंदाताई बुधवारे हे उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून सई गिधडे, भीमराव गायकवाड, ओंकारेश्वर बिडवे, अमोल जाधव, धनश्री पाटील, केतकी पाटील, रागिनी जाधव, शुभम पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते म्हणून उमाकांत कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीयसमारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव पेदेवाड यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य तीगोटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रणोती पाटील हिने केले. याच कार्यक्रमात शाळेतील इतिहास विभाग प्रमुख व्यंकटराव पुठेवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष मुंडे, ज्ञानेश्वर जवळे, दीपक हुचनाळे, दीपक हालकचे,सुरेश आडे, वरिष्ठ लिपिक जयप्रकाश माने , सुरेश पाटील, विकास मुंडकर, विशाल कदम, प्राध्यापक संतोष बिराजदार या सर्वांनी परिश्रम घेतले.