उत्तम आरोग्य हीच सुंदर व स्वस्थ जीवनाची गुरुकिल्ली – डॉ. सुवर्णा बिराजदार-दहीटणकर

उदगीर (एल.पी.उगीले) उत्तम आरोग्य हीच स्वस्थ, सुंदर व निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे मत डॉ. सुवर्णा बिराजदार- दहिटणकर यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त नवजीवन नर्सिंग कॉलेज येथे इनरव्हील क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अहमदपूर येथे व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे-रोडगे होत्या. तर प्रमुख वक्त्या म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ. सुवर्णा बिराजदार व ब्रह्मकुमारी छाया दिदी उपस्थित होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मंजुषा फुलारी, तहसीलदार उज्वला पांगरकर, लिनेस क्लबच्या अध्यक्ष प्राचार्या रेखाताई हाके, रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई चवंडा, झाशीची राणी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती जोशी, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना भुतडा, डॉ.अंजली उगिले,योग शिक्षिका प्रेमा वतनी सह मान्यवर उपस्थित होते.
डॉ.सुवर्णा दहिटणकर पुढे बोलताना म्हणाल्या की, आरोग्यदायी सुरुवात केली तर आनंददायी शेवट होतो. माणसाने नेहमी कृतज्ञ व नम्र असावं. ब्यूटिफुल बनण्यापेक्षा ड्युटी फुल बनावं. डॉ सुवर्णा यांनी शारीरिक आरोग्याबाबत तर दुसऱ्या वक्त्या ब्रम्हा कुमारी छाया दिदी यांनी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. नेहमी सकारात्मक विचार करा. मेडिटेशन करा असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना विजया भुसारे- रोडगे यांनी इनरव्हील क्लबच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अंजली उगिले यांनी केले तर सूत्रसंचालन कलावती भातांब्रे यांनी केले तर आभार प्राचार्या रेखाताई हाके-तरडे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. चंद्रकांत उगिले, योग शिक्षक शिवमूर्ती भातांब्रे, सचिव रेखा बालुरे, कोषाध्यक्षा सुरेखा उगिले, मंजुषा फुलारी, अनिता जाजू, मुख्याध्यापक आशा रोडगे, शांताबाई गिराम, छाया विळेगावे,रंजना आंधळे, लीला डबीर, संगीता चवंडा, शुभांगी पाटील,अर्चना चवंडा सह सर्व महिला मंडळाच्या सदस्या व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अंजली चव्हाण,प्रा. शुभांगी उगिले सह नवजीवन नर्सिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.