शेतकरी कर्जमाफीसाठी आ. संजयजी बनसोडे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मशाल आंदोलन

0
शेतकरी कर्जमाफीसाठी आ. संजयजी बनसोडे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मशाल आंदोलन

उदगीर (एल.पी.उगीले)
शेतकरी कर्जमाफी तसेच पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एम एस ई आर जी एस मधून करणे आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यासाठी 11 एप्रिल रोजी रात्री उदगीरचे आमदार संजयजी बनसोडे यांचे घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मशाल आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे,शहर प्रमुख शहाजहान शेख, महिला जिल्हाध्यक्षा प्रेमलता भंडे, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुर्यभान चिखले, जळकोट तालुका अध्यक्ष संग्राम गायकवाड,शहर संपर्क प्रमुख अमित खंदारे, तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, प्रहार कामगार नेते माधव शेळके, प्रहार कामगार अध्यक्ष जमोमोशा भाई शेख, कामगार शहर अध्यक्ष मौहमद शेख, हसन शेख,शहर सचिव बालाजी बिरादार,तालुका संघटक आनंद गव्हाणे, सरचिटणीस गुणवंत बिरादार, तालुका सरचिटणीस रामेश्वर स्वामी, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार, प्रशांत गंगना,शहर उपाध्यक्ष मौहमद चौधरी, शहर संघटक मधुकर गायकवाड,करडखेल शाखेचे माणिक बुरले, ज्ञानदेव कलमुकले, बालाजी बुरले, दत्ता राघु, अविनाश शिंदे आदींनी निवेदनावर स्वाक्षरी करून या आंदोलनात उपस्थित राहून आमदार निवासस्थानी नसल्याने पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आम्ही आपणास या निवेदानाद्वारे कळवितो की, महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते की, आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खायीमध्ये बुडालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
अशी परिस्थिती असताना विधानसभे मध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाही. यासाठी महाराष्ट्र विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे.
एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिल ही शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत, तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते बच्चुभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी, तसेच पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एम एस ई जी एस मधून करणे बाबत आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलो आहोत.तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त, न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा. याकरिता या मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा, या करिता हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रसंगी आमदार निवासस्थानी नसल्याने स्वतः पोलिस प्रशासन यांनी निवेदन स्वीकारून सहकार्य केले, व आपले निवेदन आमदार पर्यंत पोहचऊ असे पोलीस प्रशासन म्हटले आहे.

.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!