स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या ६ आरोपीं विरुद्ध कारवाई, ४ पीडित महिलांची सुटका

0
स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या ६ आरोपीं विरुद्ध कारवाई, ४ पीडित महिलांची सुटका

लातूर (एल.पी.उगीले) समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मानवी प्रवृत्तीच्या समाधानासाठी गुन्हे केले जातात. अगदी गंभीर स्वरूपाच्या गुण्याला देखील उत्कृष्ट असे बेगडी आदर्श व्यवसायाची जोड देऊन त्या धंद्याच्या आडून नको ते धंदे केले जातात. अशाच प्रकारे लातूर शहरात देखील स्पा सेंटरच्या नावाखाली चक्क देह विक्री होत असल्याची तक्रार येताच पोलीस पथक सतर्क झाले. सहा आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर चार पीडित महिलांना त्यास पाच सेंटरवरून मुक्त करण्यात आले आहे. या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती औरा थाई स्पाच्या नावाखाली परराज्यातील महिलांना आणून त्यांचे कडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहेत.
लागलीच या पथकाकडून पंचा समक्ष एक बनावट ग्राहक सदर स्पा वर पाठवले असता, त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खात्री पटताच, पथकाकडून औरा थाई स्पा एस. एम. टॉवर, रेल्वे स्टेशन रिंग रोड, लातूर अचानक छापा टाकण्यात आला.
सदर स्पावर आरोपी नामे रोहन संजय वाघमारे, (रा. प्रकाश नगर लातूर), अनिरुद्ध इंगळे, (रा. मंत्री नगर, लातूर), व परमेश्वर शिंदे, (रा. विशाल नगर, लातूर) हे स्पा चा मॅनेजर तसेच शशिकांत विजयकुमार कांबळे, (रा. शेल्हाळ , ता. उदगीर सध्या रा.लातूर) व मदतनीस औदुंबर गोरोबा बंडे (रा. दीपज्योती नगर,लातूर), ओमप्रसाद जयवंत शिंदे, (रा. डिंकसल, ता. कळंब) यांचे मदतीने परराज्यातील महिलांकडून थाई स्पा च्या नावाखाली स्वतःच्या फायद्यासाठी देहविक्री चा व्यवसाय व्यवसाय करून घेत होते.
सदर प्रकरणी ३ आरोपींना अटक करून ४ पीडित महिलांची सुटका करण्यात पथकाला यश आले आहे.
सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ६ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षचे पोलीस निरीक्षक, समाधान चवरे, महिला पो.उप निरीक्षक, शामल देशमुख, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुधमाती यादव, लता गिरी, निहाल मनियार यांचे पथकाने केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!