मुदखेड ग्रामस्थांच्या वतीने अरविंद बिरादार व ज्ञानोबा तेलंगे यांचा भव्य नागरी सत्कार

0
मुदखेड ग्रामस्थांच्या वतीने अरविंद बिरादार व ज्ञानोबा तेलंगे यांचा भव्य नागरी सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र, कर्नाटक सीमावर्ती भागातील कमालनगर तालुक्यातील दापका सर्कलमध्ये सुरू असलेल्या एकसष्टाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावातील सुपुत्र अरविंद बिरादार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व तसेच गावातील सुपुत्र बीएसएफ जवान ज्ञानोबा तेलंगे यांना सुद्धा सैन्य दलातील डी. आय. जी. पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त गावकरी व भजनी मंडळी यांच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. अरविंद व्यंकटराव बिरादार हे मुर्की येथील सरकारी माध्यमिक विद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करतात. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुर्की ग्रामपंचायतच्या व सरकारी माध्यमिक विद्यालय दापका यांच्या वतीने त्यांचा आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मराठी विषयाचे जिल्हास्तरीय संपन्नमुल व्यक्ती म्हणूनही विविध कार्यशाळेत मार्गदर्शन करत असतात. आपल्या गावातील एका आदर्श शिक्षकाचा सन्मान करून गावकऱ्यांनी त्यांचे खूप कौतुक केले. आपल्या परिसरात व आपल्या गावात कौतुक होणे ही साधी बाब नाही. असा योग येण्यासाठी गुरुजींना बरच काही त्याग करावा लागलं, त्या त्यागाची ही पोहच पावती आहे. त्याचबरोबर श्री ज्ञानोबा तेलंगे हे गेल्या दहा वर्षापासून भारतीय सैन्य दलामध्ये (बीएसएफ) देशसेवा करत आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झाले. मुदखेड गावातील ते पहिले आणि एकमेव सैनिक असल्याने गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान करून त्यांचे कौतुक केले. मुदखेड सारख्या एका छोट्या खेड्यातील सुपुत्र देशसेवा करतो याबद्दल गावकऱ्यांनी त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला. सत्कारला उत्तर देताना अरविंद बिरादार यांनी सर्व गावकरी मंडळींचे तोंडभरून कौतुक केले .आपल्याला मिळालेले यश , मिळालेला सन्मान या पाठीमागे आई-वडिलांची पुण्याई व सर्व वडीलधारी मंडळी यांचे आशीर्वाद व जिवलग मित्र मंडळीं यांची साथ आहे. जननी आणि जन्मभूमी यांचें ऋण कोणीही आपल्या आयुष्यत फेडू शकत नाही. या दोन्हींचाही आपल्या जीवनात नेहमी आदर ठेवला पाहिजे.अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या .आपल्या जिवलग माणसाकडून होणारा हा आपुलकीचा, पुरस्कार आहे. तो अनेक मोठ्या पुरस्कारापेक्षा महत्त्वाचा असतो. अशा शब्दात या पुरस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. प्रत्येकाला आपल्या गावचा, आपल्या जन्मभूमीचा अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे. श्री ज्ञानोबा तेलंगे यांनी देखील कठीण परिस्थितीत केलेला संघर्ष आणि देशसेवेतील आपले अनुभव व्यक्त केले. आपला सत्कार केल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. या सत्कार कार्यक्रमासाठी विनोद येलमटे, राजकुमार शेळके व चंद्रशेखर पाटील या मित्र मंडळींनी पुढाकार घेतला. याप्रसंगी गावातील लहान थोर मित्रमंडळ, भजनी मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!