रमाई मैत्री ग्रुप अनेक सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर

उदगीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, उदगीर रमाई मैत्री ग्रुपच्या सदस्या तथा माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, डॉ. ज्योतीताई सोमवंशी, प्रा.उषाताई धसवाडीकर, प्रा.आशाताई शिंदे, डॉ. जोशना माने, डॉ. बुलबुल नगराळे ,डॉ. उषाताई काळे, धावारे मॅडम, शीला कांबळे, डॉ. मस्के मॅडम इत्यादी महिला यांच्या उपस्थितीत या सर्व महिलांच्या हस्ते केक कापून, कार्यक्रम घेण्यांत आला.यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, धन्वंतरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, माजी नगरसेवक गजानन सताळकर, डॉ. गोविंद सोनकांबळे, डॉ. सोमवंशी दीपक, डॉ. विजय करपे, डॉ.नरेंद्र जाधव, जितेंद्र शिंदे, विलास शिंदे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. रमाई ग्रुपच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात, यामध्ये गतवर्षी सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटपचा कार्यक्रम,गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकाचे वाटप, समता सैनिक दलाच्या महिलांना साडी वाटप, इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रम या ग्रुपच्या वतीने राबवण्यात आले आहे. नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम या ग्रुपच्या महिला करत असतात. यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी, या ग्रुपच्या महिला नेहमीच सामाजिक काम करत असले बाबत सर्व महिलांची प्रशंशा केली. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.