शास्त्री विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक कृष्णा मारावार तर प्रमुख पाहुण्या विद्यार्थी प्रतिनिधी तनुजा पाटील यांच्यासह व्यासपीठावर उपमुख्याध्यापक अरूण पत्की,रामेश्वर मलशेट्टे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य , त्यांनी लिहिलेले संविधान व त्यांना प्राप्त झालेल्या एकूण पदव्या याविषयी सविस्तर विचार मांडले.
तर अध्यक्षीय समारोपा मध्ये कृष्णा मारावार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी असून अन्याया विरुद्ध कसे लढावे ,संघर्षातून कसे घडावे? त्यांनी अहोरात्र अभ्यास केलेला असून त्यातून आपण प्रेरणा घ्यावी. असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या बोडके , स्वागत ऋतुजा पाटील, वैयक्तिक गीत अनुष्का उदगिरे ,सामूहिक गीत शरयू पांचाळ , श्रिया महामुनी या विद्यार्थिनींनी सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा सुरवसे , गायत्री तोगरगे यांनी केले तर तन्मयी कांबळे हीने आभार मानले.