श्री पांडुरंग विद्यालयात आनंददायी शनिवार कागदी बॅच निर्मितीचा उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील मौजे कल्लूर, येथील श्री पांडुरंग विद्यालयात “आनंदायी शनिवार” या उपक्रमातुन विद्यार्थ्यांना हस्तकलेचे नाविन्यपूर्ण धडे अध्यापनातून दिले जातात. यावेळी विद्यार्थ्यांनी रंगीत पेपरच्या सहाय्याने सुंदर कागदी बॅच साकार केले.
विशेष म्हणजे 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी कलाशिक्षक चंद्रदीप नादरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने रंगीत कागदापासून बॅच तयार करून बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
त्याबद्दल मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत “विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाट मोकळी करून देणारे असे उपक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात असे सांगितले” आणि त्यांना भविष्यातील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. शिक्षक देवकते पी.बी., भोळे आर.आर ., पल्लेवाड एन. ए., कासले जि.एच., केंद्रे एम. एस. तसेच शाळेतील इतर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
