सोमनाथपूर ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर तालुक्यातील मौजे सोमनाथपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात व सोमनाथपूर येथील अंगणवाडी क्र. 1 येथे युगप्रवर्तक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अंबिका पवार या होत्या, तर अंगणवाडीच्या निरीक्षक तूपरपे अश्वीनी, ग्रामसेवक अवकाश पवार, उपसरपंच अमित माडे, सदस्या सौ.शिवकर्णा अंधारे, सुजिता चव्हाण, लक्ष्मण आडे, ज्ञानोबा पवार, अभिनव शिंदे, अश्विनी घोगरे, प्रभु आडे, राजु वैजापूरे सह सर्व सदस्य, सदस्या व ग्रामस्थ आदीं मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय संविधान निर्मात्याला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर सदस्या शिवकर्णा अंधारे यांनी विविध प्रकारे प्रकाश टाकून महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.