लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ.बोंडगे स.पां.उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.बोंडगे बाई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही शिक्षणाची कास सोडली नाही.सर्व समाजाला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी वाचाल तर वाचाल,वाचनावर जास्त भर द्यावा असे सांगितले.सुत्रसंचलन सौ.पेन्सलवार बाई यांनी केले.तर आभार सौ.स्वामी बाई यांनी मानले.