महाराष्ट्र उदयगिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विधिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत व समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या दिनविशेष समिती आणि सामाजिक समता सप्ताह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रशांत पेन्सलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे आणि एस. जी. कोडचे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.