धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

उदगीर(एल.पी.उगीले) धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते. व्यासपीठावर डॉ.सायराम श्रीगिरे, डॉ. प्रशांत बिरादार,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.मयुरी ठाकूर,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.प्राजक्ता जगताप हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताचे स्वातंत्र्य व राज्यघटना निर्मिती यामधील अतुलनीय योगदान यासंदर्भात विस्तृतपणे माहिती सांगितली. या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रश्नामंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रशांत बिरादार,सूत्रसंचालन डॉ.नामदेव बनसोडे व आभारप्रदर्शन डॉ.विष्णुकांत जाधव यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी तथा शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रवीण बलुतकर,डॉ.अमोल पाटील,डॉ.श्रुती तिवारी,ओंकार पाटील,विनायक काळे, संजय जाधव,बालाजी सूर्यवंशी, विरभद्र पाटील,प्रभाकर टोम्पे, शंकर तॊगरगे,शिवदत्त कज्जेवाड, प्रवीण बने, गणेश नावंदीकर, विजय शिंदे,यांनी प्रयत्न केले.