महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजवावे : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी
उपस्थित समाज बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करुण बुद्धवंदना घेण्यात आली.यावेळी बोलताना संजय बनसोडे यांनी बाबासाहेबांच्या तत्त्वाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. आपण सर्वजण महामानवांचे अनुयायी आहोत. समाजाच्या हिताकरिता आपण सर्वांनी एकत्र येवून युवा पिढीला बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर जीवनाची वाटचाल करण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. प्रत्येकाने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजवाविण्याची गरज असल्याचे सांगितले.
उदगीर हे चळवळीचे शहर आहे. मागील काळात या शहराची ओळख संपुर्ण जगभरात विश्वशांती बुद्ध विहाराच्या माध्यमातून झाली आहे. येत्या जुन जुलै पर्यंत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उदगीर शहरातील भव्य दिव्य पुतळा लवकरच उभारणार असुन मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करणार असल्याचे ही आ. बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी भंन्ते नागसेन बोधी, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, सिद्धेश्वर पाटील, श्रीरंग कांबळे, उषा कांबळे, अॅड.वर्षा कांबळे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, देविदास कांबळे, वसंत पाटील,रा काॅ.चे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, प्रा. मल्लेश झुंगास्वामी, दिलीप सोनकांबळे, बालाजी गायकवाड, अनिल मुदाळे, विलास शिंदे, शिवकुमार कांबळे, गौतम पिंपरे, व्यंकट बोईनवाड, श्याम डावळे, प्रदीप जोंधळे, इब्राहिम नाना पटेल, नरसिंग शिंदे, ज्ञानेश्वर बिरादार , बाळासाहेब पाटोदे , डॉ, गोविंद सोनकांबळे, विठ्ठल कोल्हे, बाबासाहेब सूर्यवंशी, सुशीलकुमार शिंदे, संघशक्ती बलांडे, सतीश पाटील मानकीकर , सतीश कांबळे, राजकुमार गंडारे, अविनाश गायकवाड, डॉ. देवेंद्र बिराजदार, प्रा. अतुल धावारे , नरसिंग कांबळे, अॅड.वसंत बोडके, मदन तुळजापुरे, अॅड.प्रफुल्लकुमार उदगीरकर यांच्या सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.