डॉ. शरदकुमार तेलगाने यांचे समाजकार्य उल्लेखनीय – विनोद तेलंगे

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर येथील ओम हॉस्पिटल अँड मॅटरनिटी चे सर्वेसर्वा ह भ प शरदकुमार तेलगाने यांचे समाजकार्य उल्लेखनीय आहे. समाजातील इतर नागरिकांनी त्यांचा आदर्श घेऊन आपण देखील या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेने काम करणे गरजेचे आहे. असे विचार प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांनी व्यक्त केले. ते ओम हॉस्पिटल तर्फे राष्ट्रसंत संत गाडगे बाबा चौकामध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. शरद कुमार तेलगाणे यांनी पानपोई सुरू केली आहे. त्या पाणीपोई च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या पाणपोई चे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माने यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. गेल्या बारा वर्षापासून मार्केट यार्डातील शेतकरी, कष्टकरी, हमाल, मापाडी या सर्वांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या शुद्ध हेतूने कीर्तनकार तथा ख्यातनाम डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही पाणपोई सुरू केली आहे. समाज आपल्यावर प्रेम करतो, आपण समाजामुळे मोठे होत आहोत तर समाजाचे काही देणे लागतो. ही भावना प्रत्येक माणसाने जोपासणे गरजेचे आहे. असेही विचार पुढे बोलताना विनोद तेलंगे यांनी स्पष्ट केले.
राजकुमार माने यांनी पाणपोईचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी ही परंपरा सुरू केल्यामुळे या भागातील जनतेची सोय झाल्याचे सांगितले. या प्रसंगी मोहन विश्वकर्मा, वेंकट थोरे, गोविंद सोनवणे, देविदास गायकवाड, म्हेत्रे मामा, काळे मामा यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.