दंतरोग तपासणी व उपचार शिबिराचा समारोप संपन्न

उदगीर, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त “महामानव अभिवादन” मौखिक दंत रोग तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. दत्तात्रेय पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक दिलीपजी गाडे, राजकुमार पुजारी, डॉ. रामप्रसाद लखोटिया, प्रा.डाॅ. विश्वनाथ गायकवाड हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी सेवा दंत रुग्णालय व आय.डी.ए. लातूर शाखा तसेच उदगीर शहरातील दंत रोग तज्ञ यांच्या तर्फे केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले, व शुभेच्छा दिल्या .
या उपक्रमात शेकडो रुग्णांनी आपली मौखिक व दंत रोग तपासणी करून घेतली. यामध्ये कित्येक रुग्णांची मोफत एक्सरे काढण्यात आले. अतिशय किडलेले दात मोफत काढण्यात आले. अनेक रुग्णांना यावेळी मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. सर्व रुग्णांना पुढील उपचारा बाबत माहिती देण्यात आली.
या उपक्रमास यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवर डॉक्टरांनी परिश्रम घेतले. यामध्ये आय.डि.ए. चे माजी अध्यक्ष विजयकुमार करपे, डॉ. संजीवकुमार बिरादार, डॉ. नरेंद्र जाधव , डॉ. गिरीश येरोळकर, डॉ.विक्रम माने, डॉ. वसंत बलांडे, डॉ .रोहिणी भंडारे, डॉ. रमेश पेंढारकर,डॉ, पंकज देबडवार, डॉ. मयूर कल्याणी, सोहन गोविंद सोनकांबळे,अमन सोनकांबळे, इत्यादी आहेत. तसेच अविनाश भरावत, शाहूराज बिरादार, जनाबाई श्रीरामे, गंगाधर सूर्यवंशी इत्यादींनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.