विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले)
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून, बहुजन विकास अभियानाच्या वतीने सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. बाबासाहेबांचे काम सर्व विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. जगामध्ये असे एकच नेते होऊन गेले की, ज्या नेत्याची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांचे थोर उपकार प्रत्येक समाजावर आहेत. जात-पात न पाहत त्यांनी या देशाला पवित्र ग्रंथ संविधानाच्या रूपातून दिलेला आहे. म्हणूनच अशा महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, अमोल सूर्यवंशी, गोरख वाघमारे, सुनील पाटील, भीमराव आळसपुरे, रवी डोंगरे, सुरेश भालेराव, रमेश भालेराव, उमाकांत मादळे, बालाजी टोम्पे, कोंडीबा भालेराव, नागनाथ गडकर, गंगाधर शेवाळे, बब्रुवान वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.