श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

उदगीर (एल.पी.उगीले)
ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या मूलमंत्राचा अंगीकार करा व आपले व्यक्तिमत्व घडवा, असा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे यांनी दिला. प्रमुख मार्गदर्शक श्री केंद्रे डी. पी. यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन परिचयाची ओळख आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कांबळे करण, कांबळे ममता व सोमासे जयश्री या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देवकते पी.बी. यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.