महात्मा बसवेश्वर जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद शेटकार

उदगीर (एल.पी.उगीले)उदगीर येथे प्रत्येक वर्षी मोठ्या उत्सहात जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली जाते.त्याच प्रमाणे या वर्षी जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रमाणात साजरी करण्यासाठी वीरशैव समाजाची बैठक घेऊन सार्वजनिक महात्मा बसवेश्वर जयंती समितीच्या अध्यक्षपदी वीरशैव समाजाचे उपाध्यक्ष प्रमोद संग्रामप्पा शेटकार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या वेळी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विविध विषयावर चर्चा करण्यात आली.जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीला सुभाष धनुरे, कपील शेटकार,अनिरुद्ध पांढरे, दिलीप माका,अनिल बागबंदे,भरत करेप्पा, ऍड.बडेहेवली,गुरूनाथ धनशेटे, बाबुराव पांढरे,संग्राम ताणशेटे, मनोहर लोहारे,राजकुमार हुडगे,कलप्पा स्वामी, ओमकार गाजुरे,तेजस आंबेसगे, आकाश आलेगावकर, शिवकुमार उपरबावडे,आडेप्पा अंजुरे यांच्यासह वीरशैव समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.