जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराजांच्या प्रेरणेने लाखो नागरिकांचे आयुष्य बदलले : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज यांचे
अध्यात्मिक व सांप्रदायिक कार्य मोठे आहे. आज देशभरात त्यांचे शिष्य व भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. महाराजांच्या प्रेरणेने त्यांच्या ‘ तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा ‘ या ब्रीद वाक्याने प्रेरीत होवुन त्यांच्या भक्तांनी समाजातील सर्वसामान्य घटकातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम अविरतपणे करत आहेत. समाजातील गरजू महिलांना आज शिलाई मशिनचे वाटप करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देण्याचे काम हे केवळ महाराजांच्या प्रेरणेने होत असुन त्यांच्यामुळे लाखो नागरिकांचे आयुष्य बदलले असल्याचे मत माजी क्रीडामंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथे आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा व दुर्बल घटक उपक्रमांतर्गत शिलाई मशीनच्या वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी डॉ. रवीराज जाधव, प्रोटोकाॅल सेक्रेटरी जोजारे, दौरा प्रमुख सौंदे, मराठवाडा पीठप्रमुख विजयकुमार देशपांडे, उत्सव समिती अध्यक्ष अनिल पुदाले, बसवराज बागबंदे, सुधीर भोसले,मनोज पुदाले, श्याम डावळे, चंद्रकांत मुचळंबे, भरत चामले, बाळासाहेब पाटोदे, कुणाल बागबंदे, वैजनाथ बिरादार, सुधाकर पाटील, प्रवीण होनराव, श्रीदेवी पाटील, अंकुश आठाणे, कृष्णा पांचाळ, भास्कर पाटील, बंडाळनाथ शिंदे, दत्ता मोटे, विजयलक्ष्मी तेलगावे, श्रीमंत लासुणे, राठोड विनायक, अविनाश यलगावे, राहुल सुरवसे, राजु नातेवार आदी उपस्थित होते.
यावेळी आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते २५ गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.यावेळी आ.संजय बनसोडे यांनी श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुकाचे दर्शन घेवुन उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 53 रुग्णवाहिका कार्यरत आहेत, याचा लाभ अपघात ग्रस्तांना होत आहे. आज पर्यंत १ लाख ३६ हजार बाॅटल्या रक्त संकलन करुन त्या शासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या असुन त्याचा फायदा गरजू व गोरगरीब रूग्णांना होत आहे. आजपर्यंत ९५ नागरिकांनी देहदान केले आहे. इ.१ ली ते पदवी पर्यंतचे मोफत शिक्षण व अंध विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करुन ज्ञानाची गंगा सर्वसामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम प्रेरणादायी आहे. वेदपाठशाळा स्थापण करुन लाखो शिष्य घडवले, हजारो वनराई बंधारे बांधले, वृक्षारोपण करुन
पर्यावरणाची जनजागृती केली. कोविड काळात अन्नधान्याचे किट वाटप केले.असे विविध उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचे पवित्र काम ते करत आहेत, असे सांगितले.
यावेळी लातूर जिल्ह्यातुन हजारो गुरु बंधु व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.