घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून अंदाजे 2 तोले सोने, चांदी आणि रक्कम असा 1 लाख 10 हजार रुपयाच्या मुद्देमालासह दोन आरोपी अटक.

0
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून अंदाजे 2 तोले सोने, चांदी आणि रक्कम असा 1 लाख 10 हजार रुपयाच्या मुद्देमालासह दोन आरोपी अटक.

लातूर (एल.पी.उगीले) लातूर शहरात झालेल्या घरफोडीच्या तपासाच्या संदर्भात कारवाई करत असताना दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. याबाबत थोडक्यात माहिती की, काही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात घरचा कडीकोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, रणजीत सावंत पोलिस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे मार्गदर्शनात विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला नमूद घराचे कडीकोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीची गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली.माहितीची खातरजमा करून पथकाने महाडा येथे दोन आरोपींना ताब्यात घेतल.त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव सुशांत शिवाजी गायकवाड, (वय 26 वर्ष, राहणार महाडा कॉलनी लातूर), कृष्णा ऊर्फ किरया गुंडेराव लोंढे (वय 22 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी लातूर).
असे असल्याचे सांगितले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी महाडा कॉलनी लातूर येथे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घराचा कुलूप कोंडा तोडून सदरचे घरामध्ये चोरी केल्याचे सांगितले, व सदरचा चोरी केलेला मुद्देमाल हा सुशांत शिवाजी गायकवाड याचे घरात लपून ठेवला असल्याचे सांगितले. सदर आरोपीचे घरातून त्यांनी चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 10 हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरचा मुद्देमाल हा पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील चार घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमाला सह ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक करीत आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, रणजीत सावंत पोलिस उपअधीक्षक लातूर शहर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे ,पोलीस अमलदार खुरम काझी ,यशपाल कांबळे, गणेश यादव, रवी गोंदकर, रणवीर देशमुख, आनंद हल्लाले, संजय बेरळीकर, महारुद्र डिगे , रमेश नामदास,अनिता सातपुते,दीपक बोन्दर यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!